क्राईम

खुल्या जागेच्या कब्जासाठी अमरावतीत रक्तरंजित

शेजारच्याने केली माय लेकाची निर्घृण हत्या ; वडील गंभीर जखमी 

अमरावती प्रतिनिधी –

अमरावतीमध्ये जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याचं समोर आलं आहे. ३०० फुट जागेसाठी आई आणि मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना २९ एप्रिल रोजी दुपारी घडली आहे. मंगलधाम परिसरातील बालाजी नगरमध्ये हे हत्यांकांड घडलं आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
आई कुंदा देशमुख आणि मुलगा सूरज देशमुख अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेत त्यांचे वडिल थोडक्यात बचावले आहेत. तर घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. वडील थोडक्यात बचावले आहेत. घटनास्थळी आरोपींची मोठी गर्दी झाली होती. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. यावेळी परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. देवानंद लोणारे असं आरोपीचं नाव असून सध्या तो फरार झाला होता. आजकाल मालमत्तेच्या वादातून अशा घटनांचं प्रमाण वाढलं आहे.
३०० फूट खुल्या जागेच्या वादातून एका शेजाऱ्याने चक्क आपल्या शेजारील मायलेकावर घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची खळबळजनक घटना अमरावती शहरातील बालाजीनगर येथे घडली. हत्येनंतर चार तासात देवानंद लोणारे नामक आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आणि मृतक यांच्या शेजारी तिनशे फूट खुली जागा आहे. मात्र, दोघांमध्ये या जागेच्या कब्जावरून वाद झाला होता. या वादातून ही हत्या करण्यात आलीय.
यावेळी घटनास्थळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी भेट दिली होती. तेव्हा पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले होते. आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, टिच भर जागेसाठी शेजाऱ्याला संपवल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!