महाराष्ट्र

तरुणाने मतदान सोडून घातले ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीचे घाव

मतदान केंद्रावर मशीनची तोडफोड

नादेड : जनसूर्या मीडिया

नांदेड लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. या मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर एका तरुणानं ईव्हीएममशिनची कुऱ्हाडीनं तोडफोड केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या गावात हा प्रकार घडला असून भय्यासाहेब येडके हा तरुण या मतदारसंघात मतदानासाठी दाखल झाला. त्यानं आपल्यासोबत लपवून कुऱ्हाड आणली होती. केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर मतदान करण्याऐवजी त्यानं ईव्हीएममशिनवरच कुऱ्हाडीनं घाव घातले. यामुळं मशिनचं नुकसानं झालं.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतलं. पण त्यानं हे कृत्य का केलं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. पण या घटनेमुळं या तरुणामध्ये निवडणुकीबद्दल एकूणच राग असल्याचं दिसून आलं आहे. अधिक चौकशीनंतर याच्यामागचं नेमकं कारण समजू शकेल.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!