वर्धा-

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हॉटेल मालकाची अफलातून ऑफर

परिवारासह १०० टक्के मतदान करा ; जेवणावर १० टक्के सवलत

वर्धा – जनसूर्या मीडिया

मतदानाची टक्केवारी वाढवी यासाठी शासन स्तरावर विविध प्रयन्त केले जातात. या राष्ट्रीय कर्तव्यात हातभार म्हणून परिवारातील १०० टक्के मतदान करणाऱ्या परिवारास १० टक्के जेवणात सवलत देण्यात येईल, अशी माहिती तंदूरचे संचालक मंदार अभ्यनकर यांनी दिली.
मतदान करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु, अनेकांना त्याची जाणीव नसते. आपण हॉटेल व्यवसायी असलो तरी सामाजिक तळमळ म्हणून कालपासून आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आपण मतदान करण्याचे आवाहन केले. आज जो परिवार १०० टक्के मतदान करेल त्या परिवाराला १० टक्के सवलत देण्यात येईल. या अभियानाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनीही कौतुक केले. ही सवलत फक्त मतदानाच्या दिवशीच असल्याचे मंदार यांनी सांगितले

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!