२४ उमेदवारांची खासदारकीसाठी उद्या होणार लढत
वर्धा जनसूर्या मीडिया –
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात वर्धा लोकसभा मतदारसंघकारिता (उद्या, 26 एप्रिल) मतदान होणार आहे. वर्धेत मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य घेऊन पथक रवाना हाेऊ लागली आहेत.
वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण १९९७ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात यंदा २४ उमेदवार रिंगणात आहे. यात भाजपाचे रामदास तडस व शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात वर्धा जिल्ह्यातील चार तर अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी या मतदारसंघाचा समावेश आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघ
एकूण उमेदवार – २४
एकूण मतदार – १६८२७७१
नवमतदार – २४८७३
एकूण मतदान केंद्र – १९९७
पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात- ६०४९
प्रशासनाची जय्यत तयारी
जिल्ह्यात या यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी या करीता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारे जनजागृती केलीय. सोबतच यंदा महिला द्वारा संचालित, युवकांद्वारा संचालित व इतर सजावट केलेली मतदान केंद्र सुद्धा तयार करण्यात आली आहे.
दिव्यांग बांधवाना मतदान केंद्रा पर्यंत पोहचविण्यासाठी वाहनची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. आता नागरिक उद्या मतदानाला किती प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल
Post Views: 66
Add Comment