धामणगाव रेल्वे

सम्राट अशोक बुद्ध विहार रामगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी – सुनील पाटील

रामगावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी कण्र्यात आली. सर्वप्रथम सकाळी ८ वाजता सम्राट अशोक बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण गावामध्ये मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात १३३ वी भीम जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमांमध्ये गावातील असंख्य पुरुष, महिला तसेच लहान मोठे मुले – मुली यांनी सहभाग घेतला असून या कार्यक्रमासाठी नवयुवक पंचशील मंडळ, रमाबाई महिला मंडळ यांनी अहोरात्र परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला. तसेच पोलीस प्रशासन विभागाने सुद्धा सहकार्य केले. याकरिता नवयुवक पंचशील मंडळ अध्यक्ष मंगेश मडामे यांनी सर्व गावकरी मंडळी, नवयुवक पंचशील मंडळ, रमाबाई महिला मंडळ तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!