क्राईम

राणी अमरावती जवळ देशी पीस्टल व जिवंत काडतूस सह सराइत गुंड बाबू पटले ला अटक

तपास अधिकारी सुरज तेलगोटे व त्यांच्या टीमची प्रशंसनीय कामगिरी

बाभुळगाव प्रतिनिधी –

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना तसेच सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन २४ तास मुस्तेद असून बारीकीतील बारीक गोष्टीवर पोलीस प्रशासनाची नजर आहे. अशातच पोलीस स्टेशन बाभुळगाव हद्दीतील राणी अमरावती ते गिमोना फाटा रोडने सराईत गुंड महेंद्र ऊर्फ बाबु पटले हा आपल्या जवळ देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूस सह कमरेत लपवून फिरत असल्याची भनक लागताच त्याला ए पी आय सुरज तेलगोटे सह त्यांच्या टीम ने शिताफीने अटक केली आहे. सदरची घटना दि. ०९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आरोपीला अटक केल्याची माहिती प्राप्त आहे.

        आरोपीकडून जप्त करण्यात आलेली देशी पिस्टल व २ जिवंत काडतूस            

    आरोपी महेंद्र उर्फ बाबू पटले, वय ३७ वर्ष हा सराईत गुंड असून त्यांच्या ताब्यातून देशी बनावटी पिस्टल अंदाजे किंमत ५० हजार, जिवंत दोन काडतूस किंमत २ हजार असा एकूण ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर कलम ३, ७, २५ आर्म ऍक्ट आर/ डब्लू १३५ महा. पो. का. सह गुन्हे दाखल केले असून गुह्याचा पुढील तपास आरोपींची पोलीस कोठडी घेउन आरोपींनी आणखी कुठे जप्त पिस्तूल ने घातपात केला आहे का व आणखी शस्त्रे आरोपी कडे आहेत का किंवा त्याने कुणाला दिली आहेत का या बाबत पुढील तपास सूरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
      सदरची कारवाई डॉ. पवन बनसोड पोलीस अधीक्षक, पियूष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक, दिनेश बैसाने एसडीपीओ, सुनील हुड पोलीस निरीक्षक पो स्टे बाभुळगाव यांचे मार्गदर्शनात एपीआय सुरज तेलगोटे, पीएसआय वाघमारे, एएसआय अशोक गायकी, एच सी सचिन हुमने, एनपीसी मंगेश कळसकर, एच सी संजय कोहाड यांनी केली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!