जनसूर्या मीडिया –
मद्यपान करणे आरोग्यासाठी नुकसानदायक मानले जाते. पण नुकत्याच एका अभ्यासात असे समोर आलेय की, कपलने एकत्रित मद्यपान केल्यास ते दीर्घायुष्य जगू शकतात. मद्यपानाचे सेवन आणि मृत्यू दरावर पडणाऱ्या प्रभावाबद्दल जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधकांनी ४५०० हून अधिक वैवाहिक कपल किंवा एकत्रित राहणाऱ्या कपल्सवर एक अभ्यास केला. यामधून समोर आलेय की, कपलने एकत्रित मद्यपान केल्यास ते दीर्घायुष्य जगू शकतात.
पार्टनरसोबत मद्यपान करण्यासंदर्भात काय म्हणतोय रिसर्च
मिशिगन युनिव्हर्सिटीच्या एका संशोधक प्रोफेसर डॉ. किरा बर्डिट यांनी ‘ड्रिंकिंग पार्टनर’ नावाचा सिद्धांत सांगितला आहे. यानुसार, मद्यपानाचे सेवन कपलने एकत्रित केल्यास त्यांचे वैवाहिक आयुष्य सुधारले जाते. खास गोष्ट अशी की, ज्या कपलने गेल्या तीन महिन्यात एकत्रित मद्यपान केलेय ते अन्य कपलच्या तुलनेत दीर्घकाळ जगले होते. यापैकी दोन ते तिघांनी मद्यपान केलेले नव्हते. त्यांच्यामध्ये मद्यपान करण्याची पद्धत विसंगत होती अथवा एक मद्यपान करायचा किंवा दुसरा मद्यपान करायचा नाही.
संशोधकांनी नक्की काय म्हटलेय?
संशोधकांनी म्हटलेय की, जेव्हा दोन व्यक्तींची मद्यपान करण्याची पद्धत एकसमान असते त्यावेळी त्यांची लाइफस्टाइल आणि नातेसंबंध उत्तम असल्याचे दर्शवले जाते. डॉ. बर्डिट यांनी म्हटले अन्य अभ्यासामध्ये दिसून आलेय की, जे कपल एकत्रित मद्यपान करतात त्यांचे नातेसंबंध उत्तम असू शकतात.
मद्यपान करणाऱ्या कपलवर आधारित रिसर्च
मद्यपान एकत्रित करणाऱ्या कपलवर खरंतर रिसर्च करण्यात आला आहे. डॉ. बर्डिट यांनी म्हटलेय की, कपलने एकत्रित मद्यपान करण्यावरून त्यांच्यामधी दीर्घायुष्य जगण्याची क्षमता आणि मद्यपान करण्यामधील संबंधाबद्दल कळण्यास मदत होऊ शकते. द जेरोन्टोलॉजिस्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात असेही दिसून आलेय की, जगण्याची क्षमता स्वतःच्या आणि जोडीदाराच्या मद्यपानाच्या कार्यानुसार बदलते.
Post Views: 89
Add Comment