धामणगाव रेल्वे

एस ओ एस कब्स मध्ये गुढी पाडवा उत्साहात साजरा

चैत्र नवरात्र व हिंदू नववर्षाचे औचित्य

धामणगाव रेल्वे

श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे चैत्र नवरात्र व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

           सर्वप्रथम पर्यवेक्षिका शबाना खान व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत गुढी उभारून पूजन करण्यात आले. यावेळी ओजस्वी खडसे आणि शिवराज धवणे मराठी वेशभूषेत आले होते. शिक्षिका आकांक्षा महल्ले यांनी मुलांना नववर्ष आणि गुढीपाडव्याची माहिती दिली.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका के साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांच्यासह प्रणिता जोशी, रेणुका साबणे, वर्षा देशमुख, वृषाली काळे, हर्षदा ठाकरे, सुप्रिया धोपटे, प्राजक्ता दारुंडे, आकांक्षा महाल्ले, राणी रावेकर यांनीही अथक परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!