सामाजिक

धामणगावात वंदे मातरम ग्रुप च्या वतीने “पाडवा पहाट” चे आयोजन

हिंदू नववर्षाची सुरुवात इंडियन आयडल सारेगामा फेम सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजात रंगणार ….

धामणगाव रेल्वे-

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी धामणगाव शहरात वंदे मातरम ग्रुप च्या वतीने पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. यावर्षी सुद्धा दिनांक ९ एप्रिल मंगळवारला वंदे मातरम ग्रुप द्वारा गुढीपाडव्याच्या “वर्ष प्रतिपदा” या शुभ मुहूर्तावर “पाडवा पहाट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पाडवा पहाट मध्ये सुप्रसिद्ध कलाकार व त्यांच्या संचासोबत सुमधुर आवाजात भक्ती संगीत, भावगीतांची मेजवानी होणार आहे.

गायिका तेजस्विनी खोडकर

                पहाटे ५.३० वाजता नगरपरिषद भिकराज गोयनका कन्या शाळा, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे येथे या वर्षी हिंदू नववर्षाची पहाट इंडियन आयडल सारेगामा फेम सुप्रसिद्ध गायक जगदीश चव्हाण व  गायिका तेजस्विनी खोडकर यांच्या गोड आवाजात  रंगणार आहे. सोबतीच डॉ. देवेंद्र यादव प्रख्यात तबलावादक नागपूर, जानराव देहाळे बासरी वादक अमरावती, सौरभ किल्लेदार कीबोर्ड वादक नागपूर, नकुल मोरे ऑक्टोपॅड वादक अमरावती यांची साथ असणार आहे.

गायक जगदीश चव्हाण

   वंदे मातरम ग्रुप धामणगाव रेल्वे द्वारा आयोजित उपरोक्त वर्ष प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर “पाडवा पहाट” या सुमधुर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वंदे मातरम ग्रुपचे अध्यक्ष व संचालकांनी  केले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!