धामणगाव रेल्वे – सुनील पाटील
दिनांक ०६ एप्रिल २०२४ शनिवार रोजी जिल्हा परिषद शाळा रामगाव च्या वतीने मतदार जनजागृती करिता संपूर्ण गावांमध्ये ” गाव फेरी ” चे आयोजन करण्यात आले होते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये आणखी भर टाकून नवीन उपक्रम म्हणून ” गाव फेरी ” हा उपक्रम संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी म्हणजे शनिवार दिनांक ०६ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आला असून रामगावात सुद्धा हा उपक्रम राबवून मतदार जनजागृती करण्यात आली.
यावेळी शाळकरी मुलां मुलींनी उपक्रमामध्ये मतदार जनजागृती करिता पोस्टर दाखवून मतदानाचे महत्व पटवून दिले. सदरच्या उपक्रमामध्ये गावांमधील प्रतिष्ठित नागरिक व जिल्हा परिषद शाळा रामगाव शाळेचे संपूर्ण विद्यार्थी, विद्यार्थिनी व शाळेचे मुख्याध्यापक नामदेव जाधव, शिक्षक सुनील राठोड, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, गावामधील महिलावर्ग सुलोचना सुनील पाटील, अमिताबाई प्रकाश मडामे, सह अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते.
Post Views: 78
Add Comment