देश / विदेश

तरुणाला चप्पल बुटाचा हार घालीत बेदम मारहाण ; लघवी प्यायला लावली ?

उत्तर प्रदेश – जनसूर्या मीडिया

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका तरुणाला आधी हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याला बूट आणि चप्पलांचा हार घालण्यात आला आणि त्यानंतर त्याला लघवीही पाजण्यात आली.
एवढेच नाही तर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाबाबत मुरादाबाद पोलिसांनी सांगितले की, ‘या संदर्भात, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना पोलीस स्टेशन सिव्हिल लाइन्सने अटक केली आहे, पुढील कारवाई सुरू आहे.’ माहितीनुसार, सिव्हिल लाइन्समधील आगवानपूर येथून कारमधील एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला खोलीत बंधक बनवून बेदम मारहाण केली. आरोपींनी त्याच्या गळ्यात चपलांच्या माळा घालून त्याला जबरदस्तीने लघवी पाजण्यात आली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!