लाहोर : जनसूर्या मीडिया
१२ वर्षीय मुलाला आईने फोन देण्यास नकार दिला त्यामुळे त्याने आत्महत्या करत स्वतःचे जीवन संपवले. यामुळे संपूर्ण रायविंड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अयान असे मृत मुलाचे नाव असून त्याने आई कडे फोन देण्यासाठी हट्ट धरला होता मात्र आईने फोन देण्यास नकार दिला.त्यानंतर आई शेजारच्या कडे निघून गेली. या संधीचा फायदा घेत आणि त्याने सिलिंगला गळफास बांधून आत्महत्या करत स्वतःचे जीवन संपवले. आई शेजारच्यांकडून परत आल्या वर अयानला गळफास घेतलेलं पाहून तिने एकच टाहो फोडला. त्यानंतर यासंपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
एका वृत्तवाहिनीवर लाहोर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अयानने त्याच्या आईला फोनसाठी विनंती केली, परंतु तिने नकार दिला आणि शेजाऱ्याच्या घरी निघून गेली. परत आल्यानंतर तिला तिच्या मुलाचा निर्जीव मृतदेह छताला लटकलेला दिसला. एआरवाय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मुलाने स्वतःचा जीव घेण्यासाठी भिंतीवर बांबूच्या खांबाला बांधलेल्या दोरीचा वापर केल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत.
लाहोरमध्ये आत्महत्याची दुसरी घटना :
अशीच दुसरी घटना लाहोर येथे घडली आहे. मुघलपुरा येथील ३३ वर्षीय डॉ. बुशरा सुहेलने आई सोबत झालेल्या जोरदार वादातून आत्महत्या केली आहे. तिची बहीण राबियाच्या म्हणण्यानुसार, वादानंतर बुशराने स्वत:ला तिच्या खोलीत कोंडून घेतले आणि नंतर ती छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली, एआरवाय न्यूजने वृत्त दिले आहे.
Post Views: 78
Add Comment