क्राईम

मामा भाच्याने केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; २ वर्षापासून सुरू होते ब्लॅकमैलिंग 

दिल्ली : जनसूर्या मीडिया 

दिल्लीतील भारतनगर भागात मामा आणि भाच्याने मिळून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी १७ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात आयटी ॲक्ट, सामूहिक बलात्कार आणि मारहाण करणं अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आरोपींनी पीडितेवर बलात्कार करून तिचा आक्षेपार्ह करण्याची धमकीही दिली होती. मागील आठवड्यात हा प्रकार घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अकरावीची विद्यार्थिनी असून ती दिल्लीतील केशवपुरम भागात राहते. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आई वजीरपूर औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या एका कारखान्यात काम करते.
पाच वर्षांपूर्वी पीडित मुलगी वजीरपूर येथील जे. जे. कॉलनीत राहत होती. तिथे तिची ओळख सुयश नावाच्या तरुणाशी झाली. २०२२ मध्ये सुयशने पीडितेवर तिच्या घरात बलात्कार केला, व त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तो करण्याची धमकी देत वारंवार त्याने पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, पीडितेचे कुटुंबीय वजीरपूर येथून केशवपुरम भागात राहण्यासाठी गेले. त्यातच गेल्या वर्षी आरोपी सुयशचं लग्न झालं. मागील आठवड्यात बुधवारी (२७ मार्च २०२४) रात्री सुयशनं व्हिडिओ डिलीट करण्याच्या बहाण्यानं पीडितेला घरी बोलवलं. त्यावेळी सुयश आणि त्याचा मामा रोहित यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेनं सकाळी हा प्रकार तिच्या एका मैत्रिणीला सांगितला. या नंतर महिला आयोगाशी संपर्क साधून या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करून पैसे उकळले

दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात दिल्लीतील सब्जी मंडी परिसरात कॉलेजच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल करीत तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी (२८ मार्च २०२४) देवांश नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, ‘एसवाय बीएची एक विद्यार्थिनी (वय २० ) तिच्या कुटुंबासह सब्जी मंडी भागात राहते. २०२२ मध्ये ती बारावीला असताना तिची देवांश नावाच्या विद्यार्थ्याशी मैत्री झाली होती. यानंतर दोघांनी डीयू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देवांशने तिच्या घरी येऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.’
तसेच देवांशने पीडितेचे फोटो सोशल मीडियावर आणि कॉलेजच्या ग्रुपमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. पीडिता तिच्या घरातून पैसे चोरून देवांशला देत होती. २५ मार्च २०२४ रोजी ती आरोपीला देण्यासाठी घरातून पैसे चोरत असताना तिच्या आईने तिला पकडलं. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!