राजकीय

वर्धा लोकसभा लढविण्यासाठी “प्रहार” कार्यकर्त्यांचे रक्तदान करून बच्चू कडू ना विनंती

प्रतिनिधी – राहुल चांभारे 

आज अमरावती येथील पंजाबराव देशमुख रूग्णालयात प्रहार कार्यकर्त्यांकडून बच्चु कडू यांनी वर्धा लोकसभा लढवावी म्हणुन रक्तदान करून मागणी केली.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असुन प्रत्येक मतदारसंघात विविध राजकीय पक्ष आपलाच उमेदवार असावा अशी मागणी धरून आहे. अश्यातच वर्धा लोकसभेत प्रहार कडून पक्षाचे संस्थापक बच्चु कडू यांनी ही निवडणूक लढावी हि मागणी जोर धरत आहेत. युती कडुन विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी घोषित झालेली असून आघाडी कडून अद्यापपर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नाही आहे. आघाडीत उमेदवारी साठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असून आहे. आघाडीकडून शैलेश अग्रवाल कि अमर काळे, नितेश कराळे कि हर्षवर्धन देशमुख हा संभ्रम सुरू आहे. अश्या परिस्थितीत बच्चु कडू यांची एंट्रीने वर्धा लोकसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. बच्चु कडू यांनी वर्धा लोकसभा स्वतः लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांची हि भुमिका युतीला मारक ठरेल असे मत राजकीय जाणकारांचे आहेत.

वंचित चा प्रभाव किती?

वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. राजेंद्र साळुंखे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून वंचित चा हा कुणबी उमेदवार देऊन किती प्रभाव पाडेल हे पाहणे औचित्याचे राहिल.

 

 बच्चु भाऊ यांनी वर्धा लोकसभा लढवुन येथील शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत पोहचावा यासाठीच आम्ही त्यांना मागणी करत आहोत. आजपर्यंत वर्धा लोकसभेतुन निवडून गेलेल्या प्रस्थापित पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत येथील शेतकऱ्यांचे, शेतमालाच्या भावाचे, घरकुलांचे, आरोग्य व्यवस्थेचे, रोजगाराचे प्रश्न उपस्थित केलेले नसून त्यांनी फक्त पक्षाची गुलामी केली आहे प्रविण हेंडवे, जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, अमरावती

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!