धामणगाव रेल्वे

चुनाव पाठशाला अंतर्गत रामगावात जि. प. शाळेच्या वतीने मतदान जनजागृती

धामणगाव रेल्वे –

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १०० टक्के मतदान व्हावे यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविल्या जात असताना दि. २६ मार्च २०२४ रोजी रामगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चुनाव पाठशाला अंतर्गत  संपूर्ण गावांमध्ये मतदान जनजागृती  प्रभात फेरी काढण्यात आली.

६०० ते ७०० मतदार असलेल्या रामगावात ठिकठिकाणी शाळेतील लहान मुलांनी प्रभात फेरी दरम्यान मतदान जागृतीचे पोस्टर दाखवून नागरिकांचे लक्ष वेधले, व नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विविध व्हिडिओ च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जि. परिषद शाळेतील शिक्षक सुनील राठोड यांनी प्रभातफेरी दरम्यान गावामधील सर्व महिला, पुरुष, वृद्ध मंडळी व दिव्यांग मतदार मंडळीना मतदानाच्या दिवशी आपले सर्व कामे बाजूला ठेवून मतदानाचा संवैधानिक अधिकार व प्रत्येक नागरिकंनी आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले.
चुनाव पाठशाला अंतर्गत शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील नागरिकांनी सुद्धा या मतदान जनजागृती ला प्रोत्साहन देत आपली उपस्थिती दर्शविली….

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!