धामणगाव रेल्वे

जळगाव आर्वीत मतदानावर जाहीर बहिष्काराचे झळकले बॅनर – पारधी समाज बांधवांचा एल्गार

धामणगाव रेल्वे

सर्व धर्म समभाव समजल्या जाणारा आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळून आज ७७ वर्ष पूर्ण झाले असताना शासनामार्फत समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा यासाठी शासनस्तरावर विविध योजना राबवितात. मात्र स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही जळगाव आर्वी येथील पारधी समाज बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ४५ वर्षांपासून जळगाव आर्वीत वास्तव्यास असणारे पारधी समाज बांधव यांच्या बेड्यावर घरकुल, शौचालय, पाणी, नाली कशाचीच व्यवस्था नसून अद्यापही हा पारधी बेडा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. एकीकडे शासन स्तरावर स्वच्छतेचा नारा देत करोडो रुपये खर्च करून स्वच्छता अभियान राबविले जाते तर दुसरीकडे जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधासुद्दा काहींच्या नशिबी नाही हे वास्तव धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी मध्ये दिसून येत आहे.

राजकीय नेते करतात फक्त मतांसाठी वापर – पारधी समाज बांधव

जळगाव आर्वीत पारधी बेड्यावर एकूण ७०० च्या जवळपास लोकसंख्या असून त्यामध्ये ४५० मतदार आहेत. निवडणुकीच्या काळात नेते फक्त मते मागायला येतात एकदा का निवडणूक झाली कि, साध ढुंकूनही त्यांच्याकडून पाहणं होत नाही. एकंदरीत दिलेल्या मताचे ऋण सुद्धा फेडता आले नसल्याचे म्हणणे सुविधांपासून वंचितग्रस्त नागरिकांचे आहे. त्यामुळे पुढे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीला जळगाव आर्वी पारधी बेड्यावरील एकही मतदार मतदान करणार नसल्याचे बॅनर झडकल्याने चर्चेला उधाण आले आहे. तर जोपर्यंत मूलभत सुविधा पूर्णपणे मिळणार नाही तो पर्यंत मतदानावर जाहीर बहिष्कार टाकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!