वर्धा-
जिल्हातील भूमिपुत्र असलेले युवा नेतृत्व इंजि ॲड. अक्षय मेहरे भारतीय हे वर्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात येणार असल्याचे माहिती मिळत आहे. देशातील सर्व सामान्य जनतेवर असणारे सर्व प्रकारची कर्ज प्रकरणे हे अतिशय उत्तम पद्धतीने सरकार समोर माफी साठी आता पर्यन्त १४लाख नोंदी प्रकरणे पाठवलेली असून, नुकतीच सुप्रीम कोर्टात जनहित याचिका सुद्धा सादर केली असून हा लढा गेल्या दोन वर्षापासून दिल्ली येथील धार्मिक एकता ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण टीम कर्जमाफी साठी प्रयत्नशील आहे. ज्या प्रमाणे सरकार ने मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले त्याच प्रमाणे सामान्य जनतेचे कर्ज माफ करावे.
कोविड मुळे ज्यांच्या घरी मृत्यू झालेला आहे त्यांचे घर कर्जामुळे जप्त होत असेल तर सरकार ने मदत करावी. सर्फेसी ॲक्ट सारख्या कायद्यात सुधार व्हावा असे एक ना अनेक गोष्टीवर ते गल्लीपासून ते दिल्ली परंत लढा देत आहेत. येणाऱ्या काळात संविधानिक मार्गाने निवडणुकीच्या रिंगणात ठाम उभे राहून संसदीय पद्धतीचा वापर करून देशातील अनेक ज्वलंत मुद्द्यांवर काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Post Views: 84
Add Comment