धामणगाव रेल्वे –
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तसेच त्यांचे गुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य धामणगाव रेल्वे शाखेचे पधाधिकारी करीत असताना दि.१७ मार्च २०२४ रोजी ” दर रविवारी – चला बौद्ध विहारी ” या अभियानाचा ६६ वा हप्ता गुंजी या गावात संपन्न झाला.
त्यानिमित्त तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड यांनी गुंजी या गावात भारतीय बौद्ध महासभेची ग्रामीण कार्यकारिणी घोषित केली असून सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर निवृत्ती कुंभारे यांनी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. जितेंद्र गडलिंग, सुनीता पोहेकर व जितेंद्र मोटघरे यांनी गीत गायन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली असून संपूर्ण विहारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. यावेळी विहारात उपस्थित सर्व बौद्ध उपासक व उपासिका याना अल्पोहार आणि चहा देण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल सुटे, सूत्र संचालन कल्पना शेंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमा सोनोने यांनी पार पाडले. सरनन्तय गाथे ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post Views: 63
Add Comment