धामणगाव रेल्वे

जनसूर्या ब्रेकिंग – मार्केट मध्ये गहू घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी

अंजनवती येथील संतोष भुरे गंभीररीत्या जखमी ; जिल्हा रुग्णालयात रेफर

धामणगाव रेल्वे –

शेतातील काढलेला गहू मार्केट मध्ये विकण्यासाठी नेत असताना अचानक दुचाकी आडवी आल्याने तिला वाचविण्याच्या नादात गव्हाणे भरलेली ट्रॉली पूर्णपणे पलटी झाली असून संपूर्ण गहू रस्त्यावर पसरला आहे. तर ट्रॉली मध्ये बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याला ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. संतोष भुरे वय – २४, रा. अंजनवती असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

अपघातात गंभीररीत्या जखमी झालेला युवक संतोष भुरे

अंजनवती येथील ट्रॅक्टर चालक मालक सुरज गावंडे यांनी शेतातील काढलेला गहू धामणगावच्या मार्केटमध्ये विकण्यासाठी निघाला होता तर त्याच्या सोबतीला आलेला गावातीलच संतोष भुरे हा गव्हाणे भरलेल्या ट्रॉलीमध्ये बसलेला होता. पॉलिटेक्निक कॉलेज समोर अचानक दुचाकी आडवी आल्याने ट्रॅक्टर चालक याने दुचाकीला वाचविण्याच्या नादात गव्हाणे भरलेली ट्रॉलीच पलटी झाली. यामध्ये मागे बसून असलेला संतोष भुरे हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या पायाला आणि डोक्याला मार लागल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात आले. तर त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याला पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविल्याची माहिती प्राप्त आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!