क्राईम

चंद्रभागा नदी पात्रातून अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यावर तळेगांव द.पोलिसांची कारवाई

आरोपी अटकेत ; ५ लक्ष ७ हजाराचा मुद्देमाल जप्त

धामणगाव रेल्वे –

तालुक्यात सातत्याने अवैध रेतीची वाहतूक सुरु असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १६ मार्च २४ रोजी पो स्टे तळेगांव हद्दीत रात्रगस्त करीत असताना ग्राम रायपूर कासारखेड ता.धामणगाव येथील चंद्रभागा नदी पात्रातून रेती काढून हद्दीतील बोरवघळ गावाकडे जाताना निळ्या रंगाचे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टरने रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमावर रेड करून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या ०१ ब्रास रेतीसह ट्रॅक्टर, ट्रॉली व साहित्य जप्त करण्यात आले असून नमूद आरोपीचे ताब्यातून एकूण ०५ लक्ष ७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक व मालक आरोपी शेख जावेद शेख इजराईल, वय ३८ वर्ष, रा.पाचखेड ता.बाभूळगाव, जि.यवतमाळ याच्यावर कलम ३७९, १३०(१)१७७ एम व्ही ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
           सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलिस अधिकारी अशीत कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे तळेगांव दशासर येथील ठाणेदार रामेश्वर धोंडगे सह हेड कॉन्स्टेबल पवन अलोणे, नरेश लोथे, पो. कॉन्स्टेबल अमर काळे, गौतम गवळे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!