चांदुर रेल्वे प्रतिनिधी :- प्रथमेश वानखडे
१३ मार्च २०२४ ला सकाळी ११ वा. आनंद सभागृह भारतीय स्टेट बँक समोर चांदुर रेल्वे येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अमरावती व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्दम विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दिशा लोकसंचालित साधन केंद्र चांदुर रेल्वे ने लिंगभाव समानतेसाठी पुरुषांशी संवाद हवा “लिंग समभाव संचेतना प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नायब तहसीलदार अनासाने तसेच पोलीस निरीक्षक अंजोडे तसेच प्रशिक्षक म्हणून प्रज्ञा गोडे उपस्थित होते. त्यांनी नैसर्गिक लिंग व सामाजिक लिंग या मधला फरक समजून सांगितले तर महिलांना कुठल्याच गोष्टी मध्ये कमी समजू नका असे सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वय अधिकारी अमरावती सुनील सोसे यांनी प्रशिक्षणाला आलेल्या पुरुषांना मार्गदर्शन केले सोबतच (एएमओ) काळमेघ उपस्थित होते.
१४ मार्च २०२४ ला प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण अधिकारी अनिल वरघट यांनी महिला रक्षणासाठी चे कायदे सांगितले तर बाल संग कर्मचारी अनिता खोब्रागडे आणि प्रशिक्षक म्हणून सुचीता बर्वे यांनी काही खेळ खेळुन प्रशिक्षणार्थीना समजून दिले की या जगा मध्ये स्त्री व पुरुष समान आहे. फक्त नैसर्गिक लिंग वेगवेगळे आहे. आणि आपण सामाजिक लिंग टाकून स्त्री यांना खाली दाबण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत असतो तर सामाजिक लिंग म्हणजे काय ? स्त्री यांना त्याचीच कामे सांगणे, स्त्री यांनी हे कापड नका घालू ते कापड नका घालू असे वेळोवेळी टोकने, स्त्री यांना मारहाण करणे व त्यांच्या वर अत्याचार करने, स्त्री यांना शिक्षणा पासून वंचित ठेवणे, स्त्री यांना पुरूषा पेक्षा कमी लेखने इ. प्रकार चे सामाजिक लिंग असतात असे संबोधले.
या कार्यक्रमाला १०२ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिराताई गजभिये यांनी केले तर प्रास्ताविक मोनाताई दुबे यांनी केले. हा कार्यक्रमा उप. स. राजेश पोहकार आणि सहयोगीनी यांनी शिस्तबद्ध व खूप छान पध्दतीने पार पाडला.
Post Views: 70
Add Comment