राजकीय

शिवसेनेचं कुंकू, राष्ट्रवादीचं मंगळसूत्र अन् काँग्रेसची जोडवी’ कोणी केली भाजपावर जहरी टीका ?

जनसूर्या मीडिया

राज्यातील महायुतीच्या जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरु आहे. अशात मागील काही काळात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडले आणि काही नेते भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले, यावरूनच राजकीय नेते अनेकदा महायुतीला नेत्यांवर टीका करतांना दिसतात. अशात याच मुद्यावरून आता बिग बॉस मराठी फेम, मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी महायुती सरकारवर जहरी टीका केली आहे. किरण माने विविध विषयांवर परखडपणे आपले मत व्यक्त करत असतो. यावरून अनेकदा त्याच्यावर टीका देखील केली जाते. परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करत आपली भूमिका सोशल मीडियावर व्यक्त करत असतात.

 

किरण माने यांची पोस्ट

“थोडक्यात काश्मीरपास्नं मंदिरापर्यन्त आदळआपट करूनबी जनसामान्यांच्या मनात स्थान न मिळवल्यामुळं, शिवसेनेचं कुंकू, राष्ट्रवादीचं मंगळसूत्र, काँग्रेसची जोडवी घालायची नामुष्की आलेल्या भाजपाची अवस्था, “सतरा नवरे… एकीला न आवरे!” अशी झालीय… आन् भाजपाच्या कार्यकर्त्यांची अवस्था? आरारारारा… “सतरा लुगडी तरीबी म्या उघडी !”
दरम्यान किरण माने यांनी दोन दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना आमदारांवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस उरले आहेत. तसेच यंदा राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर किरण माने पोस्ट करून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!