महाराष्ट्र

आळंदी येथे लॉजमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

पुणे – जनसूर्या मीडिया

आळंदी परिसरातील एका लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. तर दोन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.११) सायंकाळी सातच्या सुमारास आळंदी-मरकळ रोडवर असलेल्या शेतकरी मळा अँन्ड लॉजिंग मध्ये केली.
याबाबत पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे (वय-३६) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन लॉज चालक दिनेश नागेश्वर यादव (वय-४२ रा. तनिष्क सृष्टी सोसायटी, मरकळ रोड, आळंदी), मॅनेजर विजय शिवचरण यादव (वय-३० सध्या रा. शेतकरी मळा अँन्ड लॉजिंग मुळ रा. लोहडा थाना बौद्धगया, जि. गया बिहार) यांच्यावर आयपीसी ३७० (३), ३४ सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनीयमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
आळंदी येथील मरकळ रोडवरील शेतकरी मळा अँन्ड लॉजिंग मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध काक्षाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर लॉजमधील रुममध्ये छापा टाकून एका तरुणीची सुटका केली. आरोपी लॉजमध्ये पीडित मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोहार करीत आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!