शैक्षणिक

डॉ. होमी भाभा फाउंडेशनच्या परीक्षेत एस ओ एस च्या पार्थ पनपालिया चा महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक

धामणगाव रेल्वे

श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्सचा आठवीचा विद्यार्थी पार्थ प्रशांत पनपलिया याने शाळेने घेतलेल्या डॉ. होमी भाभा फाउंडेशनच्या परीक्षेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्याने आपल्या अभूतपूर्व यशाने शाळेचे नावलौकिक संपूर्ण तालुक्यात केले आहे.

या परीक्षेत सुमारे १ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी बत्तीस हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी पार्थ प्रशांत पनपलिया हा महाराष्ट्रातून दुसरा आला. प्राचार्य के.साई नीरजा यांच्या उपस्थितीत डॉ.होमी भाभा फाऊंडेशन ग्रुपच्या संचालिका डॉ. अस्मा फातिमा त्यांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित होत्या. त्यांनी पार्थ पनपलियाचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन गौरव केला. पार्थला संबोधित करताना त्याने त्याला लवकरच इस्रोच्या भेटीसाठी जावे लागेल असेही सांगितले.

पार्थने या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका के. साई नीरजा, विज्ञान शिक्षक विश्वास हिंगवे, कोमल मेश्राम, शिक्षक व पालकांना दिले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा आणि सर्व शिक्षकांनी पार्थचे अभूतपूर्व यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!