हटके

शेतकऱ्याला मिळाली एवढी मोठी पीक विमा रक्कम! त्याने मागितला पोलीस बंदोबस्त

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा?

अंजनसिंगी –

येथील एका शेतकऱ्याला त्याने काढलेल्या पीक विम्यामधून कंपनीने एवढी मोठी रक्कम पाठवली कि, त्या शेतकऱ्याला मिळालेली रक्कम बँकेतून घरी घेऊन जाण्यासाठी त्याने थेट ग्रामीण पोलीस अधीक्षक याना पोलीस बंदोबस्त मिळण्याबाबत चे निवेदन दिले आहे.

आता आपण विचार करत असणार कि, शेतकऱ्याला अशी किती मोठी रक्कम पीक विमा कंपनीमार्फत मिळाली की, त्याला थेट पोलीस बंदोबस्त मागावा लागला. तर जाणून घेऊ या काय आहे नेमकं प्रकरण…

           शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना १ रुपयांमध्ये पीक विमा काढून मिळणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा काढला असताना अंजनसिंगी येथील भोजराज मानकर या शेतकऱ्याने सुद्धा १ रुपयांमध्ये आपल्याकडे असलेल्या शेतीचा पीकविमा काढला. यावर्षी झालेले शेतीचे नुकसान पाहता त्या शेतकऱ्याने कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली असताना महाराष्ट्र शासन तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या शेतकऱ्याच्या खात्यात ०६/०१ २०२४ रोजी १०० रुपये टाकल्याची माहिती या शेतकऱ्याने दिली आहे. एवढी मोठी रक्कम पाहून शेतकरी सुद्दा भारावून गेला असून बँक खात्यात मिळालेली एवढी मोठी रक्कम घरी घेऊन जाण्यासाठी शेतकरी यांनी ०९ मार्च २०२४ रोजी चक्क पोलीस अधीक्षक याना पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठीचे निवेदन दिले आहे.

               सदरचे निवेदन पो. स्टे. कुऱ्हा येथील ठाणेदार यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक याना देण्यात आल्याचे समजते तर निवेदन देतेवेळी स्वा. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता कपिल पडघान, शेतकरी भोजराज मानकर यांचा मुलगा आशिष मानकर हजर होता.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!