क्राईम

लग्नाच्या काही तास आधीच वडिलांनी केली पोटच्या मुलाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

दिल्ली ( जनसूर्या मीडिया )

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलग्याच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच जन्मदात्या पित्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील देवली परिसरात घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी वडील फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी गुरवारी रात्री जयपूर येथून ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गौरव सिंघल असं असल्याचं समोर आलं आहे. तो दिल्लीमध्ये जिम चालवत होता. गौरव याची चाकूचे १५ वार करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता देवली एक्सटेंशनमधील राजू पार्कमधून हत्येच्या घटनेची माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलीस आणि पीसीआर व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. या दरम्यान, २९ वर्षीय गौरव सिंघल नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोलीस पोहोचले. तेव्हा तिथे खूप रक्त सांडले होते. चाकूने वार केल्यानंतर गौरवचा मृतदेह ओढून नेण्यात आला होता, असे दिसून आले. गौरवचा मृतदेह नातेवाईकांना लगेच मिळू नये, अशी आरोपीची योजना होती, असं त्यामधून दिसून येत होतं.
गौरव सिंघल याचं लग्न ठरलं होतं. तसेच ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील लोक बाजूच्या खोलीत लग्नाशी संबंधित कार्यक्रमासाठी जमले होते. त्याचदरम्यान वडिलांनी तीन इतर व्यक्तींच्या सोबत मिळून मुलाची हत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. डीसीपी अंकित चौहान यांनी सांगितले की, गौरवचे वडील रंगलाल सिंघल घरातून पळताना ५० लाख रुपयांचे दागिने आणि १५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी वडिलांचा काही कारणावरून मुलगा गौरव याच्यासोबत वाद झाला होता, त्यावेळी गौरवने वडिलांना मारले होते. त्यानंतर आरोपी रंगलाल याने तीन सहकाऱ्यांसोबत मिळून गौरवची हत्या केली आणि पैसे व दागिने घेऊन फरार झाला.
पोलिसांनी आणखी माहिती देताना सांगितले की, या घटनेमध्ये आणखी एक बाजू समोर आली आहे. मृत गौरव सिंघल याला लग्न करायचं नव्हतं. त्याला दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे तो लग्न करण्यास तयार झाला होता. त्यावरून मुलगा आणि वडिलांमध्ये खूप वाद व्हायचे. आता ७ मार्च रोजी मध्य रात्री नेमकं काय घडलं, ज्यातून अंकित याची हत्या झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!