तरोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत कपडे वितरण
धामणगाव रेल्वे- ता.८:-
जागतीक महिला दिनानिमित्त येथील माहेश्वरी महीला मंडळ व तालुका माहेश्वरी संघटनेतर्फे विभागीय स्पर्धेत धावपट्टी गाजविणाऱ्या महीला गट विकास अधिकारी माया वानखडे यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक व सेवाभावी उपक्रम म्हणून तरोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत कपडे वितरित करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
माहेश्वरी महीला मंडळ व तालुका माहेश्वरी महिला संघटनेचा उपक्रम
तालुक्यातील तरोडा येथील सर्वेश्वर हनुमान मंदिराच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती बेबी उईके ह्या होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सदस्य राजकुमार केला,पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष सारिका राठी, धामणगाव तालुका माहेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्ष उषा राठी,तालुका माहेश्वरी संघठनेचे अध्यक्ष मुकेश राठी, माहेश्वरी हितकारक संघाचे अध्यक्ष अनिल पनपालीया, माजी अध्यक्ष व पत्रकार मनिष मूंधड़ा, विशाल गांधी, सुभाष मुंदडा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर शेंद्रे, शिक्षण विस्तार अधिकारी दिवाण, केंद्रप्रमुख जगदीश कुमार शिरसाट व आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अमरावती विभागीय अधिकारी,कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धावपट्टी गाजविणाऱ्या महीला गट विकास अधिकारी माया वानखडे यांचा माहेश्वरी महीला मंडळ व तालुका माहेश्वरी संघटनेतर्फे गौरव करण्यात आला.तसेच सामाजिक व सेवाभावी उपक्रम म्हणून तरोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत कपडे वितरित करण्यात आले. त्याच प्रमाणे माहेश्वरी महिला मंडळाच्या वरिष्ठ सदस्य कांता राठी यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन गूंजी येथील मुख्याध्यापिका जांबकर यांनी केले तर आभार शिक्षक पवन बोके यांनी मानले.
या कार्यक्रमाला माहेश्वरी महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सीमा मूंधड़ा, सपना मूंधड़ा, अर्चना गांधी, सचिव सुनीता मूंधड़ा, चंचल मूंधड़ा, पूजा राठी, दीपा पनपालीया, किरण म.पनपालीया, मधु राठी, वंदना टावरी, कविता राठी, श्वेता इंदाणी, किरण प्र.पनपालीया, पदमा राठी, रेखा मूंधड़ा, पूनम इंदाणी, रूपा पनपालीया, शिला राठी, जयश्री मूंधड़ा, राखी राठी, सपना भट्टड, बबीता टावरी, सोनल राठी, सविता टावरी, कृष्णा भूतडा, सोनल पनपालीया, सपना राठी, शितल राठी, निर्मल भैय्या, आरती मूंधड़ा, छाया मूंधड़ा,आशा मूंधड़ा, प्रेमा राठी, जयश्री राठी, संगिता राठी,तालुका माहेश्वरी महिला संघटनेच्या उपाध्यक्ष पूनम मूंधड़ा, पूनम लाहोटी, प्रिया राठी, सचिव तिलोत्तमा मूंधड़ा, अलका लोहिया, उषा राठी, तोषिका राठी, निशा मूंधड़ा, राजश्री मूंधड़ा, अनुराधा राठी, नम्रता पनपालीया, क्रीडामंत्री अनिता राठी, राखी राठी, सुषमा राठी, कीर्ती मूंधड़ा, अर्चना मूंधड़ा, आशा भंडारी, भारती आसावा, ममता राठी, आरती लाहोटी, प्रिती गांधी, आरती पेढीवाल, दुर्गा मूंधड़ा, अर्चना राठी, चेतना मूंधड़ा, प्रिती मूंधड़ा, मोना राठी, रूपल पनपालीया, सुषमा गांधी व आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post Views: 58
Add Comment