अमरावती :
जिल्ह्यातील पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून वाद चिघळला आहे.
गावकऱ्यांनी आंबेडकरी समाजावर बहिष्कार टाकल्याचा आरोप करत २०० कुटुंबांनी बुधवारी (दि. ६) सकाळी गाव सोडले. हजारो समाज बांधव अंजनगाव सूर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाले आहेत.
ग्रामपंचायतच्या ठरावासह शासनाच्या सर्व परवानग्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीला आहेत. मात्र असे असतानाही गावातीलच काही लोकांनी विरोध करत आमच्यावर बहिष्कार टाकला आहे, असा आरोप आंबेडकरी समाज बांधवांचा आहे.
दरम्यान, बुधवारी (दि. ६ मार्च) रोजी गावात पोलीस प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता ही संचारबंदी लागू केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावरुन पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापटदेखील झाली.
Post Views: 67
Add Comment