१० वर्षांपासून गावाचा रस्ता हरविल्याचे झळकले बॅनर
धामणगाव रेल्वे –
तालुक्यातील सोन्याची खान समजल्या जाणाऱ्या गोकुळसरा गावच्या नदी पात्रातील वाळूमुळे शासनाला लाखो करोडोच्या घरात महसूल मिळतो. पण त्याच्या तुलनेत गावातील नागरिकाना सुविधा मात्र मिळत नसल्याची ओरड गोकुळसरा गावातील नागरिकांमध्ये होत आहे. तर चक्क उपसरपंच प्रतीक ढाणके यांनी १० वर्षांपासून पाठपुरावा करीत असताना सुद्धा गोकुळसरा ते बोरगाव डांबरी रस्ता हरविला असून तो शोधून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे जाहिरात बॅनर गावात लावण्याने चर्चेला उधाण आले आहे.
उपसरपंचकडून गोकुळसरा गावात लावण्यात आलेले जाहिराती बॅनर
शासनाने वाळू धोरण राबवून पहिला वाळू डेपो धामणगाव तालुक्यातील जळगाव मंगरूळ येथे सुरु केला. वाळू डेपो ला गोकुळसरा घाटातून वाळूची वाहतूक केल्या जाते. त्यामुळे सततच्या ओव्हरलोड वाहनांमुळे गोकुळसरा ते बोरगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सदरच्या रस्त्याबाबत १० वर्षांपासून पाठपुरावा करून सुद्धा गावाला रस्ता मिळाला नाही, तर राजकीय मंडळी नेत्यांना सुद्धा गोकुळसरा हे गाव फक्त मतदान असते तेव्हाच दिसते. परंतु गावातील नागरिक, विध्यार्थी याना सततचा होणारा त्रास दिसून येत नाही.
त्याकरिता राजकीय नेते मंडळी तसेच प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी चक्क गोकुळसरा ते बोरगाव डांबरी रस्ता हरविला, तो शोधून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येणार असल्याचे बॅनर यावेळी उपसरपंच प्रतीक ढानके गोकुळसरा यांनी गावात लावले आहे. त्यामुळे विविध चर्चाना उधाण आले आहे.
Add Comment