क्राईम

परदेशी महिलेवर ८ ते १० जणांचा सामूहिक बलात्कार, स्वत: बाईक चालवून पोहोचली रुग्णालयात

नवी दिल्ली ( जनसूर्या मीडिया )

भारताच्या प्रतिमेला तडा जाईल अशी एक धक्कादायक घटना घडली आहे. भारत फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ८ ते १० आरोपींनी मिळून हे कृत्य केलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. बलात्काराच्या या घटनेनंतर पीडित महिला स्वत: बाईक चालवत उपचारासाठी रुग्णालयात आली. पीडितेला डॉक्टरांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलय. पीडित महिला पतीसोबत झारखंड दुमका येथे गेली होती.
माहितीनुसार, हे प्रकरण हंसडीहा पोलीस ठाणे क्षेत्र कुरुमाहाट येथील आहे. पीडित महिला स्पेनची राहणारी आहे. महिला फिरण्यासाठी म्हणून दुमका येथे आली होती. शुक्रवारी रात्रीची ही घटना आहे. महिलेसोबत तिचा पती सुद्धा होता. ते बाईकवरुन भागलपूरला चालले होते. त्यावेळी टेंट लावून ते रस्त्यात थांबले होते.

भारतात येण्याआधी पाकिस्तानात गेले

परदेशातून हे पती-पत्नी टूरिस्ट वीजावर भारतात आले होते. हे जोडप भारतात येण्याआधी पाकिस्तानात गेलं होतं. पाकिस्तानातून बांग्लादेश आणि तिथून झारखंड दुमका येथे पोहोचले होते. दुमका हंसडीहा पोलीस ठाणे क्षेत्र कुंजी गावात तंबू टाकून हे जोडप थांबलं होतं.

अत्यंत लाजिरवाणी बाब

झारखंडवरुन ही स्पॅनिश महिला नेपाळला जाणार होती. महिला तंबूमध्ये असताना आठ ते दहा लोक तिथे आले. त्यांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केला. पीडित महिला पतीसोबत बाइकवरुन दुमका येथील हॉस्पिटलमध्ये पोहोचली. प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन एसपी पितांबर सिंह खेरवार घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. परदेशी महिलेसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा मुद्दा झारखंडच्या सभागृहात उपस्थित करण्यात आला आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याच भाजपाने म्हटलं आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!