अमरावती

महसूल विभाग व भुमाफीया यांचे संगनमत; रेवसा येथील विठ्ठल रुखमाई संस्थान ची जमीन हडपण्याचा प्रयत्न

अमरावती प्रतिनिधी

बोगस कागदपत्रांच्या आधारे मौजा रेवसा शेत सर्वे नंबर १६५ देवस्थानची जमिनीच्या ७/१२ वर खाजगी व्यक्तींच्या नोंदी केल्या. त्यावेळचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार याला जबाबदार असुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी तक्रार आजाद समाज पार्टी च्या वतीने आज अमरावती विभागीय आयुक्त व अमरावती तहसीलदार यांना पत्र देऊन करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय समोर चालू असलेल्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.

    यावेळी चिखलदरा तालुका अध्यक्ष वासुदेव पात्रे, सचिन खराळकर , उपोषणाला बसलेले प्रकाश वाकोडे, हरिभाऊ वाकोडे आणि राज्य प्रवक्ता किरण गुडधे उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!