पोरबंदर/नवी दिल्ली :
गुजरातलगत अरबी समुद्रात भारतीय सुरक्षा यंत्रणा व अमली पदार्थ विरोधी यंत्रणांनी एका इराणी जहाजातून ३३०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले असून याप्रकरणी पाच विदेशी नागिरकांना अटक केली.
समुद्रात केलेल्या कारवाईत प्रथमच इतका मोठा साठा जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे २ हजार कोटी रुपये आहे. गेल्या सात दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे़. पुणे आणि दिल्लीत झालेल्या कारवायांसह सुमारे ७,५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, नौदल, अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी), गुजरात पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईला ऐतिहासिक स्वरूपाचे यश मिळाले आहे. देशाला अमली पदार्थांपासून मुक्त करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून त्यानुसार ही पावले उचलण्यात आली आहेत.
अटक केलेले इराण किंवा पाकिस्तानचे नागरिक?
Add Comment