देश / विदेश

खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली युएस मधील भारतीय महिला, गमावले तब्बल चार कोटी रुपये

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या श्रेया दत्ताने आपली आयुष्यभराची कमाई खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्याने गमावली आहे. खरंतर हे प्रकरण अमेरिकेतील फिलाडेल्फिया  येथील आहेत. श्रेया दत्ता टेक प्रोफेशनल असून तिला 4 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
श्रेयाची जानेवारी महिन्यात एका डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एन्सेल नावाच्या एका व्यक्तीसोबत मैत्री झाली. एन्सेलने श्रेयाला तो फ्रान्सचा असल्याचे सांगत त्याचा अल्कोहोलचा व्यवसाय फिलाडेल्फियात असल्याचे सांगितले. अशातच एन्सेल आणि श्रेयामध्ये मैत्री होत एकमेकांचे मेसेजवर बोलणे सुरू झाले. नंतर मैत्री झाल्यानंतर श्रेयाला एन्सलने पैशांसंदर्भात चुना लावला. श्रेया दत्ताचा घटस्फोट झाला आहे. अशातच तिची एन्सेलसोबत मैत्री झाली. एन्सेलशी बोलताना छान वाटायचे असे श्रेयाने म्हटले आहे. श्रेयाने पोलिसांना सांगितले की, डेटिंग अ‍ॅपनंतर दोघे एकमेकांसोबत व्हॉट्सअ‍ॅपवरही बोलायचे. डीपफेकच्या  मदतीने एन्सेल श्रेयासोबत बोलायचा. श्रेयाने हे देखील सांगितले की, एन्सेलने काही वेळा भेटण्यासाठी देखील विचारले पण त्यासाठी मी नकार दिला. याशिवाय गेल्या वर्षी व्हॅलेंनटाइन डे निमित्त एन्सेलने श्रेयाला एक फुलगुच्छ देखील पाठवला होता.

नक्की काय घडले?

एन्सेलने श्रेयाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत स्वप्न दाखवली. याशिवाय एन्सेलने तिला मी लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याचे सांगत तुझा काय प्लॅन आहे? असे विचारले होते. यादरम्यान, एन्सेलने श्रेयाला क्रिप्टो करेंसीसंबंधित (Crypto Currency) एक अ‍ॅपबद्दलही सांगितले. यासंदर्भात एक लिंक देत ती सुरू करत त्यामध्ये पैसे गुंतवल्यास फार मोठा नफा होईल असे सांगितले. सुरुवातीला श्रेयाने काही पैसे टाकले आणि नंतर काढले. श्रेयाला वाटू लागले होते की, खरंच तिला पैशांचा नफा होत आहे. अशातच श्रेयाने आपली संपूर्ण आयुष्यभराची कमाई त्या अ‍ॅपमध्ये टाकली. याशिवाय नफा मिळवण्याच्या नादात कर्ज घेऊनही काही पैसे टाकले. गडबड अशावेळी झाली जेव्हा श्रेयाला त्या अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे काढता आले नाही. तेव्हा श्रेयाला आपली फार मोठी फसवणूक झालीय असे कळले.

आतापर्यंत श्रेयासारख्या हजारोंच्या संख्येने नागरिकांना लुटलेय…

श्रेयासारख्या हजारोंच्या संख्येने नागरिकांना दिवसागणिक लुटले जात आहे. FBI ने वृत्त संस्था AFP ला सांगितले की, अशा प्रकारची 40 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. फेसबुक, टिंडरसारख्या अ‍ॅपवर आर्टिफिशिअल एजेंसीसारख्या टेक्नॉलिजीचा वापर करत उत्तम प्रोफाइल तयार केले जात नागरिकांची फसवणूक केली जाते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!