सामाजिक

आपणही समाजाचं देणं लाभतो ही सामाजिक भावना मातोश्री फाउंडेशन जपत आहे – आम्रपाली (अस्तित्व किन्नर बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष) यांचे प्रतिपादन

धामणगाव रेल्वे:- 

          मातोश्री फाउंडेशन व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मंगरूळ दस्तगीर येथे घेण्यात आलेल्या विधवा, निराधार, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप हा कार्यक्रम म्हणजे आपणही समाजाचे देणे लाभतो ही भावना मातोश्री फाउंडेशन नेहमी लक्षात ठेवून समाजासाठी काम करत असते असे मत अस्तित्व किन्नर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आम्रपाली ताई यांनी बोलताना व्यक्त केले.
    मंगरूळ दस्तगीर येथे मातोश्री फाउंडेशन ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेने बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्कार तसेच रस्त्याने फिरणाऱ्या मनोरुग्ण यांच्यासाठी ही संस्था काम करते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी महिला मेळावा आयोजित करून महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन आरोग्य विषयक मार्गदर्शन आर्थिक मार्गदर्शन असा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला सुदाम देशमुख (सेवानिवृत्त न्यायाधीश मुंबई) अँड. सोनाली काळे यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. मंगरूळ दस्तगीर ठाणेदार सुलभा राऊत यांनी महिलांवर होत असलेल्या अत्याचार याबद्दल मार्गदर्शन केले. डॉक्टर सविता अप्तुलकर, सोनाली देशमुख ( शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विदर्भ संघटक) यांनी महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली. त्यानंतर मंगरूळच्या ठाणेदार सुलभा राऊत यांच्या हस्ते मातोश्री महिला अत्याचार निर्मूलन व समुपदेशन समितीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

       कार्यक्रमाला प्रकाश मारोडकर यांचे सह माधुरीताई भोंगे, शेख युसुफ भाई पठाण, छगन जाधव, अशोकराव पवार, बाळासाहेब सुरगीकर, प्राध्यापक इंगळे सर, माधुरीताई दुधे, तसेच अनेक ज्येष्ठ पत्रकार, मंगरूळ चे सरपंच, दिपाली ताई काळे धामणगाव तालुक्यातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गीताताई गुल्हाने यांनी तर आभार प्रदर्शन विवेक दगडकर यांनी केले. मातोश्री फाउंडेशन हे महिला व गोरगरिबांसाठी काम करत असून या संघटनेमध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!