बडनेरा प्रतिनिधी
धम्मकुटी मिलचाळ, नवी वस्ति बडनेरा येथे १५ ते २५ फेब्रूवारी या काळात १० दिवसीय श्रामनेरी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोपिय कार्यक्रम दिनांक २५ फेब्रूवारी ला धम्मकुटी बडनेरा येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुज्य आर्याजी धम्मशिला महाथेरी (नागपुर), कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून भंते धम्मसेन (अकोला), प्रमुख पाहुने म्हणून धम्म्प्रचारक अभय रामटेके, (चांदुर रेल्वे), विनायक बागडे ( शासकीय अधिकारी ) जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शाच पूजन करण्यात आले स्वागत गिताने भिक्षु आणि भिक्षुणी संघाच स्वागत रोहिणी कोचेकर यांनी केल. यानंतर मार्गदर्शक भंते धम्मसेंन यांनी आपल्या धम्मदेशनेतुन शिबिरार्थीना सांगितल की मनुष्य जीवन मिळणे फार कठिन आहे म्हणून ही अमूल्य संधि जाणून आपन आचरणात धम्म रूजवावा अस सांगितल. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुने धम्म्प्रचारक अभय रामटेके आणि विनायक बागडे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष धम्मशिला महाथेरी यांनी सांगितल तथागताचा धम्म समानता शिकवितो म्हणुन येथून परत जात असताना प्रेम, करुणा, मैत्री ही शिकवन आपन सोबत घेऊन जावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कोचेकर आणी आभार प्रगति भगत केले. कार्यक्रमाला आयोजक सुकेशनी आर्याजी, सुमति आर्याजी, संघमित्रा आर्याजी भिक्षु आणि भिक्षुणी संघ दिक्षा आठवले, वानखड़े ताई, सूरज आठवले, आणि अनेक बौद्ध उपासक उपासिका हजर होते.
Post Views: 79
Add Comment