सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाची महत्त्वाची बैठक संपन्न

चांदुर रेल्वे – तालुका प्रतिनिधी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाची एक छोटे खाणी बैठक लुंबिनी बुद्ध विहार अंजनसिंगी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ आठवले, महिला प्रमुख पपीताताई मनोहरे, मृदुलताताई हेरोडे, पद्माकरजी वहिले, नितीन टाले, राजाभाऊ मनोहरे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये चांदुर रेल्वे धामणगाव रेल्वेची कार्यकारणी तयार करण्यात आली. धामणगाव रेल्वे तालुका प्रमुख, म्हणून ज्योती मेश्राम, उपप्रमुख, मनोरमा वहिले, सचिव, प्रतिभाताई डोंगरे, धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष इंद्रपाल रंगारी, उपाध्यक्ष, हेमराज तूपसुंदरे, तालुका संघटक, गजानन गवई, सचिव रमेश काळे, सहसचिव पवन भोगे यांची निवड करण्यात आली आहे. चांदुर रेल्वे तालुका महिला प्रमुख म्हणून अश्विनीताई घोडेस्वार यांची निवड करण्यात आली. या बैठकीला अनेक धम्म महिला अरुणा आठवले, लता बागडे ज्योती मेश्राम, अस्विनी घोडेस्वार, बांधव उपस्थित होते.
सदरच्या चांदूर रेल्वे येथे एक दिवशीय धम्म् शिबीर दि. १० एप्रिल रोजी घेण्याचे ठरविण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष बंडू आठवले यांनी सांगितले. आणि लवकरच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन दिवसीय धम्म शिबिर घेण्यात येईल असे बैठकीमध्ये सांगण्यात आले. बैठकीमध्ये नवीन कार्यक्रमाची आखणी सुद्धा करण्यात आली असल्याचे चर्चा करण्यात आली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!