सामाजिक

कळमगांव येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन

प्रतिनिधी – धीरज भैसारे

 समता बुद्धविहार कळमगांव येथे गाडगे बाबा जयंती दिनाचे औचित्य साधुन महात्मा ज्योतिबा फुले आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम पुज्य भंते धम्मसार यांनी धम्मध्वज फड़कविला धम्मप्रचारक अभय रामटेके यांनी धम्मध्वज सुत्त घेऊन पंचरंगी ध्वजास वंदन केले. या नंतर भंतेनी त्रिसरन पंचशील देऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. अभय रामटेके यांच्या हस्ते परित्राण पाठ संपन्न झाला. पुतळ्याचे उद्घाटन अजय अहिरकर पोलिस निरीक्षक चांदुर रेल्वे यांच्या तर्फे करण्यात आले. बुद्धाची शिकवण विपश्यना मानवी जीवनास आवश्यक असन्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  

धम्म्प्रचारक अभय रामटेके यांनी बुद्धाच्या महान वज्जि सुत्ताचा उपदेश देऊन आपन मैत्री, आणि एकजुटीने राहल्यास कुठलीही गोष्ट साध्य करु शकतो आणि संघटित राहुन असाध्य गोष्ट साध्य करु शकतो अस अस आपल्या प्रवचनात सांगितल. गौतम बुद्ध यांच्या मूर्तिचे दानदाते गौकर्णाबाई सहारे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्ति आणि महात्मा फुले मूर्तिचे दानदाता या सर्वाना धम्मपद ग्रंथ अभय रामटेके यांच्या तर्फे भेट देण्यात आला. समता सैनिक दलातर्फे सलामी यावेळी देण्यात आली. मार्शल सुशील मेश्राम आणि समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते. आंबेडकरी कार्यकर्ते प्रकाश रंगारी यांनी विद्यार्थी आणि उच्च शिक्षण या विषयी आपले मत ठेवले उच्च शिक्षण हेच ऊंच भरारी आणि समाजाला यशा पर्यंत पोहचविन्याच साधन आहे अस ते बोलले.

      यावेळी उमेश गोंडाने, विनोद जोशी, कळमगाव येथील सरपंच उपसरपंच कळमजापुर येतील सरपंच उपसरपंच, पोलिस पाटिल आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका हजर होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!