राजकीय

माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या हस्ते मंगरूळ दस्तगीर येथे गुरांच्या बाजाराचा शुभारंभ

कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत उपबाजार मंगरूळ द. येथे कार्यक्रमाचे आयोजन

धामणगाव रेल्वे –

कृषि उत्पन्न बाजार समिती धामणगांव रेल्वे अंतर्गत उपबाजार आवार मंगरुळ दस्तगीर येथे आज दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरांचा बाजार भरविण्याचा शुभारंभ विरेंद्र जगताप (माजी आमदार धामणगांव विधानसभा क्षेत्र) यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे उपस्थित होत्या.

माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी आपले मनोगतामध्ये आजची शेतक-यांची स्थिती व जनावरांचे पालन पोषण करणे शेतक-यांना किती कठीण आहे. तसेच शासनाचे धोरणावर आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या. मी कायम आपल्या सुख दुखात सोबत राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, तर बाजार समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मंगरुळ द. येथील सरपंच सतीश हजारे व गावकरी मंडळींनी सतत पाठपुरावा करुन मंगरुळ दस्तगीर येथे जनावरांचा बाजार भरविणे साठीचा आग्रह लावुन धरला होता. त्यामध्ये संचालक रवि भुतडा तसेच विपीन ठाकरे, विलास भिल यांचा सुध्दा सिंहाचा वाटा आहे. आज आपल्या सर्वांचे नेते मा.प्रा. विरेन्द्रभाऊ जगताप यांचे हस्ते शुभारंभ होत असल्याने मला अतिशय आनंद होत आहे व त्यामध्ये मला संपूर्ण संचालक मंडळाचे सहकार्य लाभले. आज रोजी मंगरुळ दस्तगीर वासीयांची मागणी पूर्ण करण्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. यापुढे दर गुरुवारला जनावरांचा बाजार भरविण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगरुळ दस्तगीर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवि भुतडा यांनी केले. तर मंचावर माजी आमदार विरेंद्र जगताप, जिल्हा मध्य सह. बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, माजी जिल्हा परिषद सभापती सुरेश निमकर, बाजार समिती सभापती कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती मंगेश बोबडे, मंगरुळ दस्तगीर चे सरपंच सतिश हजारे, उपसरपंच गिरीष सुरोसे, पंचायत समिती सदस्या माधुरी दुधे, डॉ. प्रमोद रोधे, विपीन ठाकरे, चंदा रा. निस्ताने, संगीता सं. गाडे, संदीप दावेदार, दिनेश जगताप, भाऊराव बमनोटे, मुकुंद माहोरे, विलास भिल उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशांत सबाने, अविनाश इंगळे, रमेश शेंडे, यशवंत बोरकर, गुरुदास ढाकुलकर, संजय निमकर, यांचे सह असंख्य मंगरुळ दस्तगीर येथील व परिसरातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बाजार समितीचे सचिव श्री प्रविण वानखडे व आभार प्रदर्शन संचालिका सौ. चंदा रामदास निस्ताने यांनी केले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!