प्रतिनिधी – प्रथमेश वानखडे
समता सैनिक दल नागपूर यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातारगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून शाखेची स्थापना सुद्धा करण्यात आले आहे. सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला प्रमुख पाहुण्याचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी रमेश पाटील उदखेड, समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर जिल्हा अमरावती च्या उपप्रमुख सैनिक लताताई रमेश पाटील, तालुका प्रमुख रामेश्वर गडलिंग प्रामुख्याने उपस्थीत होते.
समता सैनिक दल ता. नांदगाव चे प्रमुख सैनिक रामेश्वर गडलिंग यांनी भारतीय संविधान प्रास्तावीकेचे वाचन करून समता सैनिक दल शाखा सातरगाव च्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. तसेच अमरावती जिल्ह्याच्या उपप्रमुख सैनिक लताताई रमेश पाटील यांच्या हस्ते समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर सातरगाव च्या बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनावर आधारित रामेश्वर गडलिंग यांनी आपले विचार व्यक्त केले. वाकपुर दादापुर च्या शाखा उपप्रमुख सारीकाताई अनिलराव सोनोने यांनी सर्व सैनिकांना दलाची प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमाकरिता तालुक्यातील गावामधून आलेले बहुसंख्य सैनिक उपस्थित होते. त्यामधे प्रामुख्याने समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर शाखा चिखली वैद्य येथील सर्व सैनिक सुलोचनाताई ढोकने, रमाताई संजय पाटील, गंगाताई कांबळे, सुनंदाताई ढोकने, सुजाताताई सोनोने, वैशालीताई सोनोने, ईंदुताई खडसे, वर्षाताई कांबळे, सुनिताताई नगराळे, संजयमालाताई मांडवकर, विमलताई नागदेवते, कमलाताई ढोकने, ललिताताई पाटील, रमाताई पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाखा मुंडवाडा येथील सर्व सैनिक सपनाताई राजेंद्रराव भिमगडे, ज्योतिताई हुमणे, मालाताई दिनेशराव देवरे, वंदनाताई देवरे, वृंदाताई देवरे, रमाताई देवरे, कल्पनाताई कांबळे, उषाताई देवरे, सुनिताताई हुमणे, किरणताई हुमणे, सुनिताताई बागडे, मीनाताई धवणे, संगीताताई देवरे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे शाखा वाकपुर, दादापुर सर्व सैनिक मंदाताई मधुकर ढवळे, सारीकाताई अनिल सोनोने, रिंकुताई योगिराज गडलिंग, सविताताई देवानंद मोहोड, सुर्यकांताताई रविंद्र गवई, रुपालीताई सोनोने, कांताताई काशिनाथ स्थुल, आरुषी गडलिंग, बेबीताई ढवळे, ललिताताई अवधूत मोहोड समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर शाखा सातरगाव विमलताई बोरकर, सुलोचनाताई खडसे, वर्षाताई तंबाखे, संगीताताई उके, शिंधूताई ढवळे, रंजनाताई गजभिये, बबिताताई गजभिये, सविताताई मेश्राम, प्रमिलाताई वासनिक, सुनंदाताई बागडे, सविताताई दलाल, रंजनाताई गजभिये, कल्पनाताई मेश्राम, पुनमताई बोरकर, बेबीताई गजभिये, आतिश उके, अविनाश खडसे, शिताताई मेश्राम, आणि तालुक्यातील गावामधून आलेले शेकडो सैनिक आणि दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे सदस्य मा. हंसराजराव सोनोने अमरावती तसेच गावातील बहुसंख्य उपासक व उपासीका व गावकरी मंडळी उपस्थित होते.
Post Views: 82
Add Comment