प्रतिनिधी – शशांक चौधरी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक सण आहे . हा सण 19 फेब्रुवारी रोजी (ज्युलियन तारखेनुसार) साजरा केला जातो, शिवाजी महाराज, पहिले छत्रपती आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक यांची जयंती. शिव जयंती सुरुवात ची १८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता. १८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली “शिवजयंती ” साजरी केली. त्यानंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती. परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उस्तव बंगालमधे जाउन पोहोचला.
कला व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा येथे १९ फेब्रुवारी या शिवाजी महाराज यांच्या जन्म दिनी ‘शिवजयंती’ संपन्न करण्यात आली. या प्रसंगी सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन आणि हार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निशा जोशी कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना कला व विज्ञान महाविद्यालय,कुऱ्हा यांनी केले. त्यांनी त्याच्या प्रास्ताविकामध्ये “लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.
ही परंपरा आजही चालू आहे ही काळाची गरज आहे.” असे सांगितले. त्यानंतर इतिहास विभाग प्रमुख डॉ. स्मिता जाधव यांनी शिव चरित्रावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकतांना-“ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध सैन्य आणि सुसंघटित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम आणि प्रगतीशील प्रशासन प्रदान केले. त्याने मार्शल आर्ट्समध्ये अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी युद्धाची नवीन शैली (शिवसूत्र) विकसित केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि न्यायालयीन शिष्टाचारांचे पुनरुज्जीवन केले आणि मराठी आणि संस्कृत या प्रशासनाच्या भाषा केल्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नायक म्हणून त्यांची आठवण होऊ लागली. “ असे प्रतिपादन केले.डॉ. विभा देशपांडे राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी आपल्या मनोगतामधून “आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघलसाम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा,न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली. अशा या शिव चरित्रातून विद्यार्थी प्रेरणा घेऊ शकतात. “ असे सांगितले. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी शिवगर्जना देऊन शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील आखरे यांनी शिवाजी महाराज्यांच्या जिवणार प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ.अजय अभ्यंकर यांनी केले.याप्रसंगी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत संपूर्ण कु-हा परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.या रॅलीचे विसर्जन महाविद्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील मा. प्राचार्य, विद्यार्थी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कर् कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता यश पोकळे, अक्षय दारोकर, ऋषिकेश टिंगने, संकेत पाटील, निकिता राऊत, स्वाती देशपांडे, वैष्णवी शेळके, यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम व राष्ट्रवंदना या गीताने झाली.
Post Views: 74
Add Comment