विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन दाखविली सुप्त कला
कुऱ्हा प्रतिनिधी
१८ फेब्रुवारी रोजी कुऱ्हा येथील ग्लोरी इंग्लिश कॉन्व्हेट स्कुल चे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले असून मोठ्या थाटात स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच मीना नायर उपस्थित असून कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून तिवसा केंद्र शाखा प्रमुख दिनेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून कुऱ्हा चे माजी सरपंच विजयसिंह नाहटा आदींची उपस्थिती होती.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली सुप्त कला प्रदर्शित केली. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नामदेव अंबाळकर, तसेच सचिव माधुरी अंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिका सुरोशे, सुने, व सर्व स्टाफने विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना काही भेटवस्तू सुद्धा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या सचिव माधुरी अंबाळकर यांनी केले.
Post Views: 79
Add Comment