अघोरी व त्यांच्या २० कलाकारांनी वेधले धामणगावकरांचे लक्ष
धामणगाव रेल्वे –
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजीत शिवजयंती निमित्त धामणगाव शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत धामणगाव व ग्रामीण भागातील जनतेनी व विशेष: महिलांनी लाखोंच्या संख्येत सहभाग घेतला होता.
शहरात दरवर्षी काही तरी वेगळी ओळखं असलेल्या शिवजयंती मिरवणूकीत मागच्या वर्षी २०२३ ला हरियाणा येथील सुप्रसिध्द बजरंगबली यांचा प्रतिकृती देखावा होता, तर यावर्षी मिरवणुकीत विशेष आकर्षण वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील अघोरी व २० कलाकारांचा संचने गावातील अनेक चौकाचौकात अनेक धाडसी खेळ व नृत्य सादर करतं सर्वांची मने जिंकली. तसेच बडनेरा येथील विद्यार्थी ढोल पथक पुसद येथील सैलाणी ढोल, घोडे, बँजो, वारकरी दिंडी, तसेच डी.जे च्या तालावर नाचत सर्व उपस्थितांनी आनंद साजरा केला. शिवाजी महाराजांच्या झाकीने सर्वांचे लक्ष वेधले होते. महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले त्याच विचाराने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
दत्तापुरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर, कॉटन मार्केट चौक, भगतसिंग चौक, गांधी चौक, मुकुल टॉकीज, नूतन चौक, शास्त्री चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत अनेक देखावे सह गावातील तसेच ग्रामीण भागातील शिवप्रेमी व जनतेचा सहभाग होता. तसेच आमदार प्रताप अडसड व कृषि उत्पन्न बाजार समिति सभापती कविता श्रीकांत गावंडे, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक श्रीकांत गावंडे यांनी महाराजांच्या पालखीचे पूजन करत मिरवणुकीची सुरूवात केली तर माजी आमदार विरेंद्र जगताप, डॉ.अर्चना रोठे, संदिप वाट व सर्वपक्षीय नेते यांनी मिरवणूकीत सहभाग घेत सांगता होई पर्यंत आपली उपस्थिती दर्शवली.
Add Comment