सामाजिक

शिवमहोत्सव मिरवणुकीतील मावळ्यांना समता बुद्ध विहारातर्फे शरबत वाटप

प्रतिनिधी – प्रथमेश वानखडे

शेंदुर्जना खुर्द येथे १९ फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती निम्मित प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला बालाजी ब्लड बँक अमरावती यांच्या टीमने आपले कर्तव्य पार पडले. तसेच सांय ६ वाजता गावकरी मंडळींनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. त्यामध्ये लेझीम, डान्स समावेश होता.

समता बुद्ध विहारा मधिल उपासक उपासिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून शिव जयंती निम्मित निघालेल्या सर्व मावळ्यांचे तसेच भव्य रॅलीचे स्वागत केले. तसेच त्यांना शरबत वाटप करून एकतेची भावना निर्माण केली. सदरच्या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून समता बुद्ध विहारातील उपासक उपासकांनी केलेल्या कार्याचे गावस्तरावर सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!