जखमी बालिका अमरावती रेफर
अचलपुर –
येथिल सापन नदिच्या काठावरिल प्रसिद्ध तापी भरती मठ येथे ३ वर्षीय मुलगी तिची आई व आजी सोबत मठात दर्शनास आली असता आई व आजि दर्शन घेत असतांना मंदिरात नेहमीच मोकाट विचरण करणाऱ्या तीन ते चार कुत्र्यांनी त्या चिमुकलीवर हल्ला करुन तिला गंभिररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. बालिकेच्या आरडाओरडा मुळे काहिनी कुत्र्याना हाकलुन लावले. परंतु या घटनेत बालिका गंभिर जखमी झाली आहे.
जखमी बालिकेला प्रथम येथिल उपजिल्हा रुग्नालयात दाखल केले, प्राथमिक उपचारानंतरही बालिकेची गंभिर परिस्थिति पाहता डाक्टरांनी तिला सामान्य रुग्नालय अमरावतिला रेफर करण्यास सांगितले. उल्लेखनिय बाब म्हणजे या मोकाट कुत्र्यांचा येथे येणाऱ्या जाणाऱ्यांना नेहमीच भिती लागली असते तर हे कुत्रे रस्त्याने जाणाऱ्या दुचाकिच्या मागे धावत असल्याने अनेक दुर्घटना देखील घडल्या आहे. परंतु संबधित प्रशासन अजूनही निद्रावस्थेत असल्याने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करित नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करीत आहे.
Post Views: 74
Add Comment