राजकीय

मंगरूळ दस्तगीर येथे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य अभियान

प्रतिनिधी :- धीरज भैसारे

आज दिनांक १८ रविवार रोजी मंगरूळ दस्तगीर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने राज्यस्तरीय प्राथमिक सदस्य अभियान अंतर्गत प्रशांत मुन जिल्हा संघटक रिपाई आठवले यांच्या मार्गदर्शनात तालुका महिला आघाडी च्या अध्यक्षा कु. संजिवनीताई पचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदस्य अभियान राबविण्यात आले. यामध्ये आरती वैरागडे.सौ. साधना लहाबर, आकाश मुन, स्नेहल वानखडे, आदु पचारे, गणपत पोकळे, संगिता निकाळे, शितल तायवाडे, प्रांजली काळे, निलेश भलावी, रामराव पचारे, शुभांगी भगत, रोशन बनसोड सह अनेकांनी पक्ष प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.

         तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मजबूत करुन रामदास आठवले केन्द्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांचे हात मजबूत करू असा संकल्प केला. तसेच संजिवनी पचारे यांनी सौ साधनाताई लहाबर यांना मंगरुळ दस्तगीर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून नेमणूक केली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!