कुऱ्हा हद्दीतील कालव्यामध्ये अंघोळ करीत असताना गेला होता वाहून
धामणगाव रेल्वे –
आज दिनांक १७ फेब्रुवारी रोजी गंगाजळी येथील शेतकरी नंदू वानखडे यांच्या शेतानजीक असलेल्या कालव्यामध्ये दुपारी १ वाजता अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगताना दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. सदरची माहिती दत्तापूर पोलीस स्टेशनला कळविण्यात आल्याने तात्काळ पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी इतरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. व उत्तरीय तपासणी करीता मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान सदर मृतदेहाची ओळख पटली असून राजकुमार रामकोमल हर्जन ( वय २४ ) असे त्या मृतक युवकाचे नाव. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कुऱ्हा हद्दीतील कालव्या मध्ये अंघोळ करण्याकरिता गेला असताना पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता. सदर युवक दिल्लीतील केसमपुरम येथील रहिवाशी असल्याची माहिती प्राप्त आहे, तर कामाकरिता तो कुऱ्हा येथे आला होता.
मागील काही महिण्यापासून कुऱ्हा हद्दीतील कालव्याचे काम सुरु असताना राजकुमार राम कोमल तिथेच मजूर म्हणून काम करीत होता. ३ दिवस अगोदर बुधवार रोजी संध्याकाळी ७ वाजता अंघोळ करण्यासाठी तो कालव्यात उतरला परंतु पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता. सदरची माहिती कुऱ्हा पोलिसांना देण्यात आली असताना शोध पथकाद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली होती परंतु तो युवक मिळून आला नाही मात्र आज गंगाजळी शेतशिवारातील शेतकरी नंदू वानखडे यांच्या शेतानजीक तरंगणारा मृतदेह दिसून आल्याने तो राजकुमार रामकोमल हर्जन चा असल्याचे निष्पन्न झाले.
Post Views: 71
Add Comment