धामणगाव रेल्वे

जनसुर्या बिग ब्रेकींग ; मेन कॅनल मध्ये तरंगताना आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

धामणगाव रेल्वे –
 

तालुक्यातील गंगाजळी शेतशिवारात अप्पर वर्धा मेन कॅनल मध्ये एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्टोन क्रशर वरील ट्रक ड्रायव्हरला आज दुपारी १ च्या सुमारास मृतदेह तरंगताना आढळून आला असता त्याने सदर माहिती पोलीस पाटील याना दिली. त्यावेळी गंगाजळी येथील पोलीस पाटील भारती गावंडे यांनी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन याबाबत दत्तापूर पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आल्याचे सांगितले. सदर चा मृतदेह पुरुष जातीचा असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त आहे.
          वृत्त लिहिस्तोवर मृतदेहाची ओळख पटलेली नाही…

क्रमशः ….

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!