खेळ / क्रीडा

रात्र कालीन प्लास्टिक बॉलचे खुले सामन्यात धामणगाव रेल्वे च्या टीमने मारली बाजी

प्रतिनिधी – धीरज भैसारे

स्व. श्री सुनील बापूरावजी बोरकर स्मृती प्रित्यर्थ आसरा क्रिकेट क्लब भिल्ली द्वारा आयोजित रात्रकालीन प्लास्टिक बॉलचे खुले सामन्याचे आयोजन भिल्ली येथे करण्यात आले होते. १० फेब्रुवारी सदरच्या सामन्याचे उदघाटन परीक्षित जगताप यांच्या हस्ते करण्यात आले असून डॉ. आशिष सालनकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 

१५ फेब्रुवारी अंतिम सामना धामणगाव रेल्वे ते आसरा ग्रुप यांच्या मध्ये खेळवण्यात आला असताना धामणगावच्या टीमने आपले वर्चस्व दाखवीत प्रथम पारितोषिक ( १५ हजार ) पटकाविले तर आसरा ग्रुप भिल्ली याना द्वितीय पारितोषिक ( १० हजार ) मिळाले तर तिसरे पारितोषिक ( ७ हजार ) शिरपूर तिरंगा याना देण्यात आले.

कार्यक्रमाचे बक्षिस वितरण काँग्रेस पदाधिकारी देवराव कापसे, पुरुषोत्तम कापसे, मोरेश्वर सहारे, गजानन तलमले, राजीव वानखडे, जगदीश मेश्राम, यांच्या हस्ते देण्यात आले

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!