विभागीय जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात सुरुवात
अमरावती – ता. १४
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते करण्यात आला. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे टीम दिवस हा सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून अमरावती विभागस्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन केले. या महोत्सवात पाच जिल्ह्यातील २ हजार खेळाडू सहभागी झाले आहे. यावेळी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांचे अध्यक्षतेत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपआयुक्त (विकास) संतोष कवडे, आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सहभागी जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंना तणावरहित क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन केले. यासोबतच क्रीडा स्पर्धा नंतर कार्यालयात काम करतांना भेदभाव विसरून टीम वर्क म्हणून काम करण्याचा मौलिक सल्ला अधिकारी व कर्मचारी यांना दिला. अमरावती पूर्वी अकोला व वाशिम येथे प्रशासकीय कामकाज केल्याने सर्वच जिल्हा परिषद सोबत माझा स्नेहबंध कायम असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी अध्यक्षीय उदबोधनात दरम्यान अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी कर्मचाऱ्यांचे कलागुणांचे कौतुक केले. कर्मचारी आपले वय विसरून येथे खेळाडू म्हणून सादरीकरण करत आहे ही खरंच प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी म्हटले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, वित्त व लेखाधिकारी चंद्रशेखर खंडारे, उपजिल्हा समन्वयक क्रांती काटोले, कळंबचे गटविकास अधिकारी सुभाष मानकर, बुलढाणा उपमुख्य कार्यकारी अधिकारीआशिष पवार ,वाशिम उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळ, गटविकास अधिकारी माया वानखेडे, विनोद खेडकर, सुधीर अरबट, शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने ,अकोला शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, यवतमाळचे शिक्षणाधिकारी गजानन दाभेराव यांचेसह विविध खातेप्रमुख, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,शिक्षक संघटना पदाधिकारी, विविध जिल्हा परिषद कर्मचारी संघटना पदाधिकारी, कंत्राटी कर्मचारी संघटना पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक क्रीडा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके यांनी,संचालन क्षिप्रा मानकर तर आभार क्रीडा संयोजक डॉ.नितीन उंडे यांनी मानले.
अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हा परिषदा आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच दैनंदिन कामकाजात नवचैतन्य निर्माण होऊन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील स्नेहबंध आणखी दृढ होण्यासाठी जिल्हा परिषद, अमरावती यांचे मार्फत विभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान सांघिक व वैयक्तिक मैदानी खेळ होत असून सायंकाळी ६ ते रात्री १० दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान खेळाडू आपल्या अंगी असलेल्या कराओके, हास्यजत्रा, समुहनृत्य, भावगीत, लोकगीत, एकलनृत्य, युगलगीत, सिनेगीत चे सादरीकरण होत आहे. दरम्यान विभागीय क्रीडा व सांस्कृतिक यशस्वी होण्याकरिता जिल्हा परिषदेचे अधिकारी,कर्मचारी, सर्व संघटनेचे कर्तव्य बजावत आहे.
विविध देखावे व निदर्शने ठरले आकर्षण
या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अमरावती,यवतमाळ,वाशिम,बुलढाणा,अकोला व विभागीय आयुक्त कार्यालया मार्फत विविध विषयावर देखावे व
निदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले.विविध नृत्य,महाराष्ट्राची संस्कृती आदी उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.तसेच उद्घाटनीय कार्यक्रम दरम्यान अमरावती जिल्हा परिषदेने अमरावती जिल्ह्यातील थोर पुरुष, भगवान शंकर व नंदिवर आधारित, बुलढाणा जिल्हा परिषदेने मोबाईलचे दुष्परिणाम , यवतमाळ जिल्हा परिषदेने निसर्गावर आधारित जन,जमीन, जंगल वर आधारित प्रदर्शन , अकोला जिल्हा परिषदेने महाराष्टातील लोकं कला व परंपरा , वाशिम जिल्हा परिषदेने पर्यावरण वाचवा देश वाचवा,स्वच्छताअभियान, नवसाक्षरता अभियान आदी विविध विषयावर झांकीचे सादरीकरण केले.
सांघिक व वैयक्तीक स्पर्धा मध्ये क्रिकेट, फुटबाॅल, व्हाॅलीबाॅल, कबड्डी,खो-खो, टेनिक्वाईट, बॅडमिटन, टेबल टेनिस, कॅरम, बुध्दीबळ, जलतरण, धावणे, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी महीला व पुरूष खेळाडू सहभागी झाले आहे. सांस्कतिक कार्यक्रमामध्ये भक्तीगीत,भावगीत,लोकगीत,सिनेगीत,करावके गीत, समुह गीत, एकल गीत, युगलगीत, अभिनय, झाँकी याचा समावेश असून दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपला कला आविष्कार सादर करीत आहे.दैंनदिन सततच्या कामाचा ताणतणाव कमी व्हावा या करीता दरवर्षी विभागीय जि.प,अधिकारी व कर्मचारी क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले आहे.
विविध समिती प्रमुख
अमरावती विभागस्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशस्वीपणे संपन्न व्हावा यासाठी विविध समिती स्थापित करण्यात आल्या आहेत.यात समिती प्रमुख म्हणून गट विकास अधिकारी विनोद खेडकर, गट विकास अधिकारी माया वानखडे, गटशिक्षणाधिकारी दीपक कोकतरे, नितीन उंडे, संदीप बोडखे, डी. सी. गायकवाड, अश्विन मानकर, संतोष घुगे, प्रवीण खांडेकर, गुणवंत वरघट, मोहम्मद अशफाक, संजय राठी, पंकज गुल्हाने, गजानन कोरडे, चंद्रशेखर टेकाडे, पंजाबराव पवार, चंद्रशेखर रामटेके, राजेश सावरकर, धनंजय वानखडे, रामेश्वर माळवे, प्रमिला शेंडे, अजित पाटील व आदी कर्तव्य बजावत आहे.
सोशल मीडियावर खेळाचे लाइव्ह ब्रॉडकॉस्टिंग
विभागस्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बुधवारपासून (ता.१४) श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर होत आहे. या महोत्सवाचे फेसबुक लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्यांतील प्रेक्षकांना सांघिक, वैयक्तिक खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मोबाईलवर घरबसल्या मिळत आहे.या अभिनव उपक्रमाचे लाइव्ह ब्रॉडकॉस्टिंग जिल्हा परिषदेचे तंत्रस्नेही कर्मचारी करीत आहे.
१६ फेब्रुवारीला बक्षीस वितरण
Add Comment