धामणगाव रेल्वे

जनसुर्या ब्रेकिंग

कापूस घेऊन जाणारा आयशर ट्रक चा अपघात ; मंगरूळ फाट्याजवळील घटना

धामणगाव रेल्वे –

कापसाची वाहतूक करणारा आयशर ट्रक क्र. एम एच २९ बी. इ ५६८१ या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जुना धामणगाव नजीक मंगरूळ फाट्यावर ट्रक पलटी झाल्याची घटना १४ फेब्रुवारी च्या मध्यरात्री १ सुमारास घडली. सुदैवाने कुणाचीही जीवितहानी झाली नसून, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
       मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयशर ट्रक क्र. एम एच २९ बी. इ ५६८१ महागाव वरून आर्वीकडे कापसाची विक्री करण्यासाठी जात असताना रात्री १ ते २ च्या सुमारास वाहन चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मंगरूळ फाट्याजवळील कॉर्नर वर ट्रक पलटी होऊन ट्रकचा अपघात झाला. त्यामध्ये कुणाचीही जीवित झाली नसून फक्त ट्रकचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सदरची घटना काल रात्री झाल्याने आज सकाळी मोठ्याप्रमाणात नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती तर सदर घटनेचा पंचनामा पोलीस प्रशासन करीत होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!